हरयाणामधील सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीने अखेर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाच्या माध्यमातून तिने राजकारणात प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजपा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये तिने भाजपामध्ये प्रवेश केला.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे. या मोहीमेमध्ये सहभाग घेत सपनाने भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलं. यावेळी भाजप नेते शिवराज सिंह चौहान, मनोज तिवारी, हर्षवर्धन सिंह आदींसह अन्य दिग्गज नेते उपस्थित होते.