श्रीलंका आणि विंडीज यांच्यातील विश्वचषक सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण विंडीजने गोलंदाज हा निर्णय सार्थ ठरवू शकले नाहीत. अविष्का फर्नांडोच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने त्रिशतकी मजल मारली. ५० षटकात त्यांनी ३३८ धावा केल्या आणि विंडीजला ३३९ धावांचे आव्हान दिले.
FIRST #CWC19 CENTURY by a Sri Lankan!
What an innings this has been from Avishka Fernando – he brings up his maiden international off as many deliveries. #SLvWI | #LionsRoar pic.twitter.com/yPgx2r88Ub
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 1, 2019
या सामन्यात अविष्का फर्नांडो या २१ वर्षीय खेळाडूने दमदार शतक झळकावले. त्याने १०३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकार खेचत १०४ धावा केल्या. पण शतक ठोकल्यानंतर तो लगेचच बाद झाला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकवणारा तो सर्वात तरुण श्रीलंकन फलंदाज ठरला. या आधी श्रीलंकेच्या लाहिरू थिरिमन्ने याने २५ वर्षाचा असताना २०१५ साली विश्वचषकात शतक ठोकले होते. तो विक्रम आज फर्नांडोने मोडीत काढला. तसेच विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात जगात देखील तो तिसऱ्या क्रमांकाचा तरुण फलंदाज ठरला. या आधी पॉल स्टर्लिंगने २० वर्षे आणि १९६ दिवस इतके वय असताना २०११ मध्ये नेदरलँड्स विरुद्ध शतक केले होते. तर रिकी पॉन्टिंग याने २१ वर्ष आणि ९६ दिवस वय असताना १९९६ साली शतक झळकावले होते. त्यानंतर फर्नांडोने आज २१ वर्ष आणि ८७ दिवस इतके वय असताना शानदार शतकी खेळी केली.
Youngest player to score a century in World Cup:
20y 196d – Paul Stirling v NETH, 2011
21y 76d – Ricky Ponting v WI, 1996
21y 87d – AVISHKA FERNANDO v WI, TodaySL’s prev youngest: Lahiru Thirimanne (25y 204d in 2015); the non-striker when Fernando completed 100. #CWC19 #WIvSL
— Sampath Bandarupalli (@SampathStats) July 1, 2019
दरम्यान, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. ९३ धावांची भक्कम सलामी श्रीलंकेचे सलामीवीर करुणरत्ने आणि कुशल परेरा यांनी दिली. मोठा फटका मारताना कर्णधार जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर करुणरत्ने ३२ धावांवर बाद झाला. पण कुशल परेराने डाव सावरत अर्धशतक पूर्ण केले. तो धावेच्या गोंधळामुळे धावबाद झाला. पहिली धाव पूर्ण करून तो दुसरी धाव घेण्यासाठी धावला, पण त्याला अविष्का फर्नांडोने धावेसाठी नकार दिला. पण त्याच्या दुर्दैवाने तो क्रीजमध्ये वेळेत पोहोचू शकला नाही. ६४ धावा करून त्याला तंबूत परतावे लागले. त्यानंतर कुशल मेंडिसच्या साथीने फर्नांडोने डाव पुढे नेला. मेंडिसने चांगली सुरुवात केली होती, पण फॅबियन ऍलन च्या गोलंदाजीवर तो त्याच्याकडेच झेल देऊन बाद झाला.
त्यानंतर अनुभवी अँजेलो मॅथ्यूजही चांगली सुरुवात मिळाल्यानंतर बाद झाला. त्याने २० चेंडूत २६ धावा केल्या. अविष्का फर्नांडोने मात्र एक बाजू लावून धरली आणि दमदार शतक झळकावले. पण शतक ठोकल्यानंतर तो लगेचच बाद झाला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकवणारा तो सर्वात तरुण श्रीलंकन फलंदाज ठरला. त्याने १०३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकार खेचत १०४ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लाहिरू थिरिमन्ने याने डाव सावरत श्रीलंकेला तीनशे पार मजल मारली. थिरिमन्नेने नाबाद ४५ धावा केल्या.