पोलीस दलास मिळालेल्या अधिकारांचा त्यांच्याकडून गैरवापर होत असून त्यामुळे त्यांची प्रतिमा कमालीची डागाळलेली आहे, या कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पोलीस दलावर ताशेरे मारले आहेत. पोलीस दल हे शिस्तबद्ध असल्याचे मानले जाते आणि कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. लोकांचाही या दलावर मोठा विश्वास आहे आणि पोलीस दलाने या विश्वासास पात्र राहिले पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे पोलीस दलाची प्रतिमा डागाळलेली असून ही बाब कमालीची चिंतेची आहे. पोलीस दलाकडून अधिकारांचा होणारा गैरवापरही चिंताजनक ठरल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.