अमेरिकी कायद्याच्या कचाटय़ात सापडलेल्या देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक पातळीवर निर्माण झालेली कटुता संपण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने खोब्रागडे यांना सुनावणीपूर्व प्रक्रियेतून वगळण्याचे जवळपास निश्चित केले आहे. ही प्रक्रिया सोमवारी होणार होती. त्यात आता खोब्रागडे यांना हजर राहावे लागणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
खोब्रागडे यांना अमेरिकेने प्राथमिक सुनावणीच्या आधी होणाऱ्या प्रक्रियांतून सूट दिली नसती तर त्यांना आणखी वैद्यकीय चाचण्या, बोटांचे ठसे देणे अशा अनेक कटकटींना सामोरे जावे लागले असते. देवयानी खोब्रागडे यांची आणखी मानखंडना होऊ नये असे भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता ख्रिसमस तोंडावर आल्याने सरकारी कार्यालये बंद राहणार असून, पुढील निर्णय वेगाने घडवून आणण्यात भारत सरकारची कसोटी लागणार आहे.
दरम्यान, खोब्रागडे यांची न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्रांच्या स्थायीस्वरूपी मिशनमध्ये बदली करण्यात आली असून त्यांना राजनैतिक अधिकाऱ्याचे सर्व विशेषाधिकार बहाल करण्यात यावे अशी विनंती भारताने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यान्ंना केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2013 रोजी प्रकाशित
देवयानी खोब्रागडे यांना माफी मिळणार?
अमेरिकी कायद्याच्या कचाटय़ात सापडलेल्या देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक पातळीवर निर्माण झालेली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-12-2013 at 02:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In us hint of a thaw indian diplomat devyani may get pre trial waiver