याचा अर्थ आमचा प्रकल्प तडीस जाण्याइतक्या योग्यतेचा आहे व आता आणखी वेगाने या प्रकल्पातील अंतराळयानाची निर्मिती प्रक्रिया पुढे नेली जाईल, असे डॉनेली यांनी स्पष्ट केले. ओसिरीस रेक्स प्रकल्पातील मुख्य संशोधक दाँते लॉरेटा यांनी सांगितले की, बेन्नू लघुग्रहावर पोहोचण्यासाठी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे पण आम्ही ते करून दाखवू. अतिशय जुन्या अशा या लघुग्रहावरील नमुने पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न यात आहे.
‘बेन्नू’ लघुग्रहाची मोहीम
‘बेन्नू’ या लघुग्रहावर सौरमालेच्या निर्मितीच्या वेळचे पुरावे मिळण्याची शक्यता असून त्यासाठी ओसिरिस रेक्स हे अंतराळयान त्याच्या दिशेने सोडले जाईल. या लघुग्रहाच्या गुणधर्माचा अभ्यास यात केला जाणार असून पृथ्वीवरून त्याचे निरीक्षण करून जी माहिती मिळाली आहे त्याच्याशी या माहितीची तुलना केली जाणार आहे. ओसिरीस रेक्स हे यान या लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील घटकांचे (६० ग्रॅम) नमुने गोळा करून आणणार आहे.