शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. परंतु हा सामना रद्द झाल्यामुळे शनिवारी समाजमाध्यमांवर वेगळीच चर्चा ऐकायला मिळाली. त्याचे कारण म्हणजे १९९२च्या विश्वचषकात पाकिस्तानचा पहिल्या लढतीत पराभव, दुसऱ्या सामन्यात विजय, तर तिसरा सामना पावसामुळेच रद्द झाला होता. त्याचप्रमाणे यंदाच्या विश्वचषकातही पाकिस्तानने पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे पराभव व विजय मिळवल्यानंतर त्यांचा श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. या योगायोगामुळेच १९९२च्या विश्वचषकाप्रमाणे पाकिस्तान या वेळी विश्वविजेतेपदसुद्धा मिळवणार का, अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली होती.