भारतीयांनी ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत तब्बल २३ हजार ७०० कोटींची रोख देणगी दिल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. अशोका विद्यापीठाच्या “सेंटर फॉर सोशल इम्पॅक्ट अँड फिलान्थ्रॉपी”(CSIP) विभागाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. घरगुती देणग्यांबाबत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ६४ टक्के म्हणजेच १६ हजार १०० कोटींची देणगी ही धार्मिक संस्थांना देण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निनावी देणग्यांच्या मर्यादेत घट? ; निवडणूक आयोगाचा केंद्राकडे प्रस्ताव 

बहुतांश भारतीय देणगी रोख स्वरुपात द्यायला पसंती दर्शवतात. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिकांकडून जास्त देणगी दिली जाते, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यातील सर्वाधिक देणग्या या मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांनी दिल्या आहेत. देशातील १८ राज्यांमधील ८१ हजार कुटुंबाशी दुरध्वनी किंवा वैयक्तिकरित्या संपर्क साधल्यानंतर मिळालेल्या माहितीतून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी ईडी-सीबीआयचा गैरवापर करत नाहीत, तर…,” ममता बॅनर्जींचं मोठं विधान, विधानसभेत जोरदार भाषण

करोना काळात १५ टक्के कुटुंबांनी १ हजार १०० कोटी गैर धार्मिक संस्थांना दान म्हणून दिले आहेत. भिकाऱ्यांना या कालावधीत २ हजार ९०० रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीचा वाटा बाजारात १२ टक्के आहे. त्यानंतर भारतीयांनी कुटुंबीय आणि मित्रांना २ हजार कोटींची मदत केल्याचे या सर्वेक्षणात नमुद करण्यात आले आहे. देणगी प्राप्त करणाऱ्यांमध्ये सर्वात शेवटचा क्रमांक घरगुती कामगारांचा आहे. या कामगारांना बाजाराच्या ४ टक्के म्हणजेच १ हजार कोटींची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या अभ्यासानुसार पुरुषांनी धार्मिक संस्था, कुटुंबीय आणि मित्रांना तर महिलांनी भिकारी आणि घरगुती कर्मचाऱ्यांना देणगी देण्यास पसंती दर्शवली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India donated 23700 crore to religious organizations during covid rvs