देशात करोनाचं संकट असताना आता सामन्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागत आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर त्याचे परिणाम आता इतर वस्तूंवर दिसू लागले आहे. आता उद्यापासून म्हणजेच १ जुलैपासून अमूल दूध २ रुपये प्रति लिटर महाग होणार आहे. संपूर्ण देशात नव्या किंमतीनुसार दूध उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर अमूलच्या सर्व प्रोडक्टवर दोन रुपयांची वाढ होणार आहे. यात अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रीम या प्रोडक्टचा समावेश आहे. दीड वर्षानंतर अमूलने आपले दर वाढवले आहेत. नवे दर लागू झाल्यानंतर अमूल गोल्ड ५८ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसहित अन्य राज्यांना दूध महाग मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अमूल दुधाच्या किंमतीत उद्यापासून २ रुपयांनी वाढ होणार आहे. नव्या किंमती अमूल गोल्ड, ताजा, शक्ती, टी स्पेशलसह गाय आणि म्हैशीच्या दुधावरही लागू होणार आहेत. जनावरांचं खाद्य महागलं आहे. त्याचबरोबर पॅकेजिंगची किंमतीही ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच परिवहन, वीज यांच्या किंमतीही ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे”, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

ब्राझीलकडून ३२ कोटी डॉलर्सच्या लस खरेदीला स्थगिती; ‘भारत बायोटेक’ने स्पष्ट केली भूमिका

दुधाच्या किंमती वाढल्याने आता दुसऱ्या डेअरी प्रोडक्टच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. पनीर, तूप, ताक, लस्सी, आइसक्रिम यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inflation hits ordinary citizens amul milk increase rate rs 2 per litre rmt