राजस्थान रॉयल्सच्या संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला, त्या ९ मेच्या रात्री क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण रात्रभर जागे होते, असे पंचतारांकित हॉटेलच्या सीसीटीव्हीतील चित्रिकरणातून स्पष्ट झाले आहे. हे दोघेही रात्री सातत्याने त्यांच्या खोलीबाहेर पडत होते आणि व्हरांड्यात बुकी जिजू जनार्दन यांच्याशी बोलत होते, हेदेखील सीसीटीव्ही कॅमेऱयात बंदिस्त झाले आहे.
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी १६ मेला श्रीशांत, चव्हाण आणि अजित चंडिला या तीन क्रिकेटपटूंना अटक केली. त्या पार्श्वभूमीवर या चित्रिकरणाला महत्त्व आहे. त्या रात्री स्पॉट फिक्सिंगच्याच आरोपावरून अटक केलेल्या जिजू जर्नादन याच्यासोबत श्रीशांत आणि चव्हाण दोघेही खोलीबाहेरील व्हरांड्यात बोलत असल्याचे दिसते. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या मुलीही या क्रिकेटपटूंबरोबर दिसल्या आहेत. नऊ मे रोजी रात्री सव्वादहा वाजल्यापासून दहा मेच्या पहाटेपर्यंत हे दोन्ही क्रिकेटपटू सातत्याने व्हरांड्यात येत होते, असे चित्रिकरणावरून दिसते.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2013 रोजी प्रकाशित
स्पॉट फिक्सिंग: सीसीटीव्ही कॅमेऱयात दिसताहेत श्रीशांत, चव्हाण, जिजू आणि दोन महिला
राजस्थान रॉयल्सच्या संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला, त्या ९ मेच्या रात्री क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण रात्रभर जागे होते, असे पंचतारांकित हॉटेलच्या सीसीटीव्हीतील चित्रिकरणातून स्पष्ट झाले आहे
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 27-05-2013 at 03:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl spot fixing cctv footage of sreesanth ankeet chavan bookie jiju