scorecardresearch

आयपीएल २०२४

IPL (Indian Premier League) ही भारतामधील सर्वात मोठी टी-२० फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. २००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याद्वारे दरवर्षी आयपीएलचे आयोजन करण्यात येते. ब्रिजेश पटेल हे आयपीएलचे अध्यक्ष, तर जय शाह हे सचिव आहेत. यंदाच्या वर्षी आयपीएलचे १६ वे पर्व असणार आहे. आयपीएलची संकल्पना बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांची होती असे म्हटले जाते. २००७ मध्ये भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वत्र टी-२० सामन्यांचे वारे वाहू लागले. तेव्हा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसद्वारे इंडियन क्रिकेट लीग (ICL) ची घोषणा करण्यात आली. याला आयसीसी आणि बीसीसीआयची परवानगी नव्हती. क्रिकेटपटूंनी आयसीएलमध्ये खेळू नये यासाठी बीसीसीआयने त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले.

पुढे त्यांनी आयसीएलला पर्याय म्हणून आयपीएलची स्थापना केली असे म्हटले जाते. आयपीएलच्या पहिल्या हंगामामध्ये शेन वॉर्न यांच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळा आयपीएलचे चषक मिळवले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा एकमेव खेळाडू आहे. गतवर्षी आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश करण्यात आला. त्यातील गुजरात टायटन्स या संघाने २०२२चे आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. लवकरच २०२३ मधील आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Read More
Ipl-2024-top-record
12 Photos
IPL 2024: आयपीएल स्पर्धेत ‘या’ खेळाडूंच्या नावावर आहेत टॉप रेकॉर्ड्स

2024 ची आवृत्ती सुरू होण्यापूर्वी आयपीएलच्या इतिहासातील खेळाडूंच्या सर्वोच्च विक्रमांबद्दल जाणून घेऊया.

Why was Rohit Sharma removed from captaincy Hardik and Boucher silent after asking such a question
IPL 2024 : रोहित शर्माबद्दल ‘हा’ प्रश्न विचारताच, हार्दिक-बाऊचरने बाळगले मौन, VIDEO होतोय व्हायरल

Hardik Pandya Video Viral : मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर हार्दिक पंड्या पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. यादरम्यान रोहितला कर्णधारपदावरुन…

Hardik Pandya on Rohit Sharma
IPL 2024 : रोहित शर्माचाच वारसा मी पुढे नेणार; हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना ग्वाही

Hardik Pandya on Rohit Sharma : हार्दिक पंड्या या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याआधी रोहित शर्माने त्याच्या…

WPL-2-2024-rcb-vs-dc
10 Photos
WPL 2024 : पहिल्यांदाच विजेतेपद पटकावून ‘आरसीबी’ संघाने रचला इतिहास, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसह इतर पुरस्कार देखील जिंकले

आयपीएल भारतात अत्यंत चर्चेत असते आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. क्रिकेट प्रेमी या लीगची उत्सुकतेने वाट पाहत असतात पण यंदा…

Who Is 21 year old Shreyanka Patil
Shreyanka Patil : आरसीबीची चाहती बनली आरसीबीचीच स्टार! कोण आहे २१ वर्षीय श्रेयंका पाटील? जाणून घ्या, तिचा रोमांचक क्रिकेटचा प्रवास

तुम्हाला माहिती आहे का, २१ वर्षीय श्रेयंका पाटील कोण आहे? आज आपण आरसीबीच्या या महिला क्रिकेटर स्टारविषयी जाणून घेणार आहोत.

BAN vs SL 3rd ODI Match Mustafizur Rahman injured
IPL 2024 : आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जला तिसरा धक्का! वेगवान गोलंदाजाला दुखापत, स्ट्रेचरवरून गेला मैदानाबाहेर

Mustafizur Rahman Injured : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज…

Punjab Kings Jersey For IPL 2024
IPL 2024 : बीसीसीआयने आयपीएल जर्सीवर ‘या’ रंगांना का बंदी घातली? प्रीती झिंटाने केला मोठा खुलासा

Punjab Kings Jersey For IPL 2024 : जर्सी लॉन्च इव्हेंटमध्ये बोलताना, झिंटाने आगामी सीझनसाठी जर्सीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर झिंटाने…

Virat Kohli Returns to India Video Viral
IPL 2024 : विराट कोहली आयपीएलपूर्वी भारतात दाखल! विमानतळावरील VIDEO होतोय व्हायरल

Virat Kohli Returns to India : स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघाकडून खेळण्यासाठी सज्ज…

Huge Injury Concern For MS Dhoni And CSK: Star Set To Be Ruled Out For 4-5 Weeks
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, स्टार गोलंदाज आयपीएलमधून ४-५ आठवडे बाहेर राहण्याची शक्यता

Matheesha Pathirana Injury Updates : हाताच्या दुखापतीमुळे मथीशा पथिराना चार ते पाच आठवडे बाहेर राहणार आहे. ६ मार्च रोजी बांगलादेश…

Dhruv Jurel Gets Salute Welcome While Joining the Rajasthan Royals Camp
IPL 2024: ‘सॅल्युट’ करत ध्रुव जुरेलचे राजस्थान रॉयल्सकडून अनोखं स्वागत, व्हिडिओ होतोय व्हायरल

Dhruv Jurel Salute Welcome Video: ध्रुव जुरेल राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला आहे. संघात सामील होत असताना त्याचे जोरदार स्वागत…

Ravichandran Ashwin thanked MS Dhoni
Ravichandran Ashwin : ‘मी आयुष्यभर धोनीचा ऋणी राहीन’, १३ वर्षे जुनी घटना आठवून अश्विन झाला भावुक

Ravichandran Ashwin : टीम इंडियाचा अनुभवी कसोटी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तो…

Big Blow to Mumbai Indians As Dilshan Madushanka out of Initial matches of IPL 2024
IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज सुरूवातीच्या सामन्यांमधून बाहेर

Mumbai Indians: आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर झाला आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×