आधी युक्रेन-रशिया युद्ध, त्यानंतर हमासमुळे गाझापट्टीत सुरू झालेले इस्रायलचे हल्ले त्यामुळे जगभरात अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा जगावर युद्धाचे सावट घोंगावत असल्याचे समोर आले आहे. इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करू शकते, अशी शक्यता वॉल स्ट्रिट जर्नलने व्यक्त केली आहे. इराणमधील नेत्यांच्या सूत्राच्या हवाल्याने वॉल स्ट्रिट जर्नलने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय परराष्ट्र खात्याने दिले महत्त्वाचे आदेश

इराण आणि इस्रायल दरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. भारतीय नागरिकांनी पुढचे आदेश येईपर्यंत इराण किंवा इस्रायलमध्ये प्रवास करू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच सध्या या दोन देशांत जे भारतीय नागरिक राहत आहेत, त्यांनी तात्काळ तिथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करावी, असेही निर्देश दिले आहेत.

इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

इराण आणि इस्रायलचे शत्रूत्व नवे नाही. इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष पेटल्यानंतर इराण युद्धात उतरणार, अशी चर्चा होती. मात्र ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबायचे नाव घेत नाही. वॉल स्ट्रिट जर्नलने दिलेल्या बातमीनुसार, इस्रायलवर थेट हल्ला करण्यासंबंधीच्या राजकीय जोखमीचे मूल्यमापन इराणी राज्यकर्ते करत आहेत.

इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या सल्लागाराने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलवर हल्ला चढविण्याची योजना सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासमोर तयार आहे. मात्र त्यातील राजकीय जोखमीचा ते अंदाज घेत आहेत.

सिरीयातील इराणच्या दूतावासावर इस्रायलचा हवाई हल्ला; किमान ६ ठार झाल्याचा युद्धविरोधी संस्थेचा दावा

सीरीयातील दमास्कस येथे इराणच्या वाणिज्य दूतावासावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या हल्ल्यात इराणचा एक सर्वोच्च जनरल आणि सहा लष्करी अधिकारी ठार झाले. या हल्ल्याचा सूड घेण्याचे वचन इराणच्या नेत्यांनी दिले होते. इस्रायलच्या हवाई दलाने १ एप्रिल रोजी दमास्कसमधील इराणच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला केला होता. ज्यामध्ये इराणी अधिकारी मारले गेले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran could attack israel in 48 hours says report kvg