झारखंडमधील लटेहर जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. यावेळी चकमकीदरम्यान एक महिला नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 लाटेहर सदर पोलिस ठाण्यापासून आठ किमी अंतरावर असलेल्या जंगलात आज पहाटे दोन ते चार या वेळेत सुरक्षा रक्षक आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली.  जखमी नक्षलवादी महिलेला अटक करण्यात आली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकारी अजय लिंडा यांनी दिली. सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारानंतर सुमारे दहा माओवादी जंगलात पळून गेल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jharkhand two naxals killed in encounter with crpf