नोंदणीकृत नसलेल्या प्रसारमाध्यमांवर कारवाई करा, ते सरकार विरोधात बातम्या पसरवत आहेत, जम्मू काश्मीरमधील जिल्हा दंडाधिकाऱ्याचे पत्र

पत्रकारितेतील कोणतीही पदवी, पात्रता किंवा परवानगी न घेता अनाधिकृतपणे पोर्टल चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रामबन यांनी केली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये नोंदणी नसलेली प्रसारमाध्यमे सरकारविरोधात बातम्या देत आहेत. अशा प्रसारमाध्यमांवर कारवाई करण्याची मागणी जम्मू काश्मीरचे दंडाधिकारी डीएम रामबन यांनी केली आहेत. रामबन यांनी पोलीस अधीक्षकांना याबाबत पत्रही लिहले आहे.

काही अनाधिकृत आणि नोंदणी नसलेले प्रसारमाध्यमे जम्मू काश्मीर सरकारविरोधात सोशल मीडियावर बातम्या पसरवत आहे. मुख्यत फेसबुकवरून अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्यात येत असल्याचा आरोप रामबन यांनी केला आहे.

पत्रकारांचीही चौकशी करण्यात यावी

अधीकृत नोंदणी नसलेले असे बनावट मीडिया गट ओळखण्यात यावेत. तसेच पत्रकारितेतील कोणतीही पदवी, पात्रता किंवा परवानगी न घेता अनाधिकृतपणे पोर्टल चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रामबन यांनी केली आहे. एवढचं नाही तर अशा बनावट प्रसारमाध्यमांसाठी काम करणाऱ्या पत्रकारांचीही चौकशी करण्यात यावी आणि अशी प्रसारमाध्ये चालवण्यासाठी लागणारा निधी कोणत्या मार्गाने उभा केला जातो याची चौकशी करण्याचीही मागणी रामबन यांनी पत्राद्वारे केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jk identify fake media groups operating wo proper registration in the district

Next Story
ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी पूर्ण; वाराणसी कोर्ट उद्या देणार निकाल
फोटो गॅलरी