जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाषा विषयाच्या एका विद्यार्थिनीचा सहाध्यायी विद्यार्थ्यांने विनयभंग केला.
पोलिसांच्या मते ही घटना शनिवारी घडली असून त्याबाबत वसंतकुंज उत्तर येथे प्राथमिक माहिती अहवाल सादर करण्यात आला आहे. ही मुलगी अभ्यासासाठी वाचनालयात गेली असता त्या मुलाने तिचा हात धरला. ग्रंथपालांना सांगूनही काही कारवाई न करण्यात आल्याने तिने पोलिसात तक्रार केली.
याच विद्यापीठात एका पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थिनीवर एकाने लग्नाच्या आमिषाने बलात्कार  केल्याची तक्रारही पोलिसात दाखल झाल्याचे सूत्रांनी या वेळी सांगितले.