माकपचे माजी सरचिटणीस प्रकाश करात यांच्याकडे पक्षाचे मुखपत्र असलेल्या पीपल्स डेमॉक्रसीच्या संपादकपदीची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. यापूर्वी सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याकडे ही जबाबदारी होती.
पक्षाच्या दिल्लीत झालेल्या सेंट्रल कमिटीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. जनता परिवारातील ऐक्याबाबत चित्र स्पष्ट होत नसल्याने बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूक इतर डाव्या पक्षांच्या सहकार्याने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याखेरीज इतर धर्मनिरपेक्ष पक्षांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-06-2015 at 02:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karat likely to take over as editor of peoples democracy