वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असताना हा वाद अधुनमधून राजकीय पटलावर येतो. त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बासवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूर शहर आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा केला. यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि अक्कलकोट भागात बोम्मई यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. तर, काही ठिकाणी कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहण्यात आलं. यावरून बसवराज बोम्मई संतापले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राज्यात कायदा, सुव्यवस्था राखणे हे संबंधित सरकारचे काम आहे. कोणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आंदोलन करत असतील, तर त्याचा मी निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने तत्काळ कारवाई करुन हे थांबवण्याची विनंती करतो. अन्यथा यामुळे राज्यांत फूट पडण्याची शक्यता आहे. आम्ही कायद्याचे पालन करणारी लोक आहोत,” असे बसवराज बोम्मई यांनी सांगितलं.

“सीमावादावर २००४ साली महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याविरुद्ध भविष्यात लढत राहू, ते आमचे पहिले प्राधान्य असणार आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याकडे आमचं लक्ष आहे. आमच्या सीमांचं आणि जनतेचं रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे बोम्मई यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnatak cm basavaraj bommai say take action protest in maharashtra ssa