Kohinoor : ब्रिटनची संस्कृती, मीडिया आणि क्रीडा मंत्री लिसा नंदी या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्लीत त्यांनी भारताचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. दोघांनी एका नव्या सांस्कृतिक करारावर सह्या केल्या. आज लिसा नंदी यांनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना कोहिनूर बाबत प्रश्न विचारण्यात आला.

१८५९ मध्ये कोहिनूर हिरा क्वीन व्हिक्टोरियाकडे

भारताचा १०८ कॅरेटचा कोहिनूर हिरा हा क्वीन व्हिक्टोरियांना १८४९ मध्ये महाराजा दुलीप सिंग यांनी दिला होता. त्यानंतर १९३७ मध्ये तो राणीच्या मुकुटात जडवण्यात आला. हा हिरा भारताचा आहे तो भारताला परत देणार का? हे विचारलं असता लिसा नंदी यांनी उत्तर दिलं. राणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात भारतातील प्रसिद्ध कोहिनूर हा हिरा जडवण्यात आला होता.

लिसा नंदी काय म्हणाल्या?

प्रदीर्घ कालावधीपासून ब्रिटन आणि भारत याबाबत चर्चा करत आहेत. दोन्ही देश एकमेकांसह मिळून काम करत आहेत. ब्रिटन आणि भारत दोन्ही देशांच्या संस्कृती वेगळ्या आहेत आणि सांस्कृतिक कलाकृतींची देवाणघेवाण झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. याबाबत मी माझ्या समकक्षांशी चर्चा करणार आहे. रचनात्मक व्यवसायांचा विचार केला तर युके आणि भारत हे दोन्ही देश उत्तम आहेत. तसंच सिनेमा, फॅशन, टीव्ही, संगीत, गेमिंग या सगळ्यांमध्ये दोन्ही देश आघाडीवर आहेत. दोन्ही देश उत्तम प्रकारची उत्पादनं निर्यात करतात. आमचं सायन्स म्युझियम संयुक्त सहयोगाने प्रदर्शनं भरवतं आहे. विविध वस्तुंच्या दौऱ्यांसाठी इथलं राष्ट्रीय संग्रहालय, विज्ञान संग्रहालयासह काम करतं आहे. आमची या विषयावर चर्चा सुरु आहे असं लिसा नंदींनी म्हटलं आहे.

ब्रिटनच्या राजमुकुटात कसा आला कोहिनूर हिरा?

१८४९ मध्ये ब्रिटिशींना भारतातल्या पंजाबवर ताबा मिळवला. त्यानंतर कोहिनूर हिरा राणी व्हिक्टोरिया यांच्या मुकुटात जडवण्यात आला. तेव्हापासूनच हा हिरा ब्रिटनच्या राजघराण्यातील राजमुकुटाचा अविभाज्य भाग झाला आहे. एलिझाबेथ द्वितीय यांनी २५ व्या वर्षी ६ फेब्रुवारी १९५२ ला ब्रिटनचं महाराणी पद स्वीकारलं होतं. त्यानंतर हा मुकुट त्यांच्याकडे आला.आता हा हिरा भारतात परत आणला जाईल का? असा प्रश्न लिसा नंदी यांना विचाऱण्यात आला. त्यावर त्यांनी आमची याबाबत चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे.

कोहिनूरची वैशिष्ट्ये काय?

१) कोहिनूर हा जगातला सर्वात प्रसिद्ध हिरा आहे. हा एक चमकदार आणि अंडाकृती नैसर्गिक हिरा आहे.

२) कोहिनूर हा जगातला सर्वात महागडा हिरा म्हणून ओळखला जातो.

३) कोहिनूर हिरा १.४ इंच लांब, १.३ इंच रुदं आणि ०.५ इंच खोल आहे. ब्रिलियंट हिऱ्यांना सामान्यतः ५८ पैलू पाडलेले असतात. कोहिनूर हिऱ्यामध्ये अतिरिक्त ८ पैलू आहेत. त्यामुळे या हिऱ्याला एकूण ६६ पैलू आहेत.

४) कोहिनूर हिऱ्याची आत्ताची किंमत ही २० अब्ज यूएस डॉलर्सहून अधिक आहे.