आयपीएल सामन्यांमध्ये सट्टा लावल्याचे आरोप होत असल्याने राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांनी आपला खटला चालवण्यासाठी ख्यातनाम वकील माजिद मेमन यांना नियुक्त केले आहे.
आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कुंद्रा यांनी कबुली दिल्याचे गुरुवारी दिल्ली पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी चौकशीनंतर सांगितले होते. कुंद्राचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला आहे. परंतु कुंद्रा मात्र ठामपणे ‘सत्य लवकरच प्रकाशात येईल’, असे सांगतो आहे.
‘‘मी आता माझा बचाव करण्यासाठी माजिद मेमन यांना वकीलपत्र दिले आहे. माझे अधिकृत निवेदन आता त्यांच्यामार्फतच येईल आणि सत्याचा विजय होईल,’’ असे कुंद्रा यांनी ‘ट्विटर’वर म्हटले आहे.
ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या कुंद्रा यांची बुधवारी दिल्ली पोलिसांनी ११ तास चौकशी केली होती. कारण कुंद्रा यांचे व्यावसायिक भागीदार आणि मित्र उमेश गोएंका यांनी आपल्याला संघरचना आणि खेळपट्टीसंदर्भात माहिती विचारल्याचे साक्षीदार क्रिकेटपटू सिद्धार्थ त्रिवेदीने पोलिसांना सांगितले होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2013 रोजी प्रकाशित
माजिद मेमन करणार कुंद्रा यांची वकिली
आयपीएल सामन्यांमध्ये सट्टा लावल्याचे आरोप होत असल्याने राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांनी आपला खटला चालवण्यासाठी ख्यातनाम वकील माजिद मेमन यांना नियुक्त केले आहे.
First published on: 07-06-2013 at 06:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kundra appoints noted lawyer majeed memon to defend him