पुलवामा जिल्ह्य़ांत पोलीस आणि लष्करासमवेत झालेल्या चकमकीत शनिवारी लष्कर-ए-तोयबाचा कडवा दहशतवादी इर्शाद ठार झाला. त्याच्यावर १० लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इर्शाद हा पुलवामा जिल्ह्य़ातील काकापोरा येथील रहिवासी असून जून २०१३ मध्ये हैदरपोरा परिसरात लष्कराच्या आठ जवानांच्या हत्याकांडप्रकरणी तो हवा होता. त्याने लष्कर आणि पोलिसांवर अनेक हल्ले केले होते, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
काकापोर येथील बेगम बाग परिसरात काही दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी तेथे शोधसत्र सुरू केले त्या वेळी झालेल्या चकमकीत इर्शाद ठार झाला. अनेक हल्ल्यांप्रकरणी तो हवा होता, असे पोलिसांनी सांगितले.
या परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर गोळाबार सुरू केला. त्यामुळे लष्कराला पाचारण करण्यात आले आणि संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आणि त्यामध्ये इर्शाद ठार झाला. हैदरपोरा आणि एका हॉटेलवर करण्यात आलेल्या हल्ल्यात त्याचे नाव पुढे आल्याने सुरक्षारक्षकांनी त्याचा शोध घेण्याची मोहीम अधिक तीव्र केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lashkare e tayaba orthodox terrorist shoot