Who is Liang Wenfeng ?: गेल्या काही दिवसांपासून भारताच्या शेअर बाजाराचा आलेख काहीसा खालच्या बाजूला झुकताना दिसतो आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशात अमेरिकेच्या शेअर बाजारात डीपसीक तंत्रज्ञान वापरलं जात असल्याने खळबळ उडाली आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही डीपसीक म्हणजे अमेरिकेसाठी धोक्याचा इशारा आहे असं म्हटलं आहे. दरम्यान या डीपसीकमागचा चेहरा म्हणजेच लियांग वेंगफेंग कोण आहेत? आपण जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डीपसीक म्हणजे नेमकं काय?

मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारं DeepSeek तंत्रज्ञान म्हणजे सोप्या शब्दांत ChatGPT चा चीनी पर्याय आहे. मात्र, यात सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे चॅटजीपीटीपेक्षा अतिशय स्वस्तात हे तंत्रज्ञान उभं करण्यात आलं आहे. अॅपलच्या अॅप स्टोअरवर DeepSeekचं मोबाईल अॅप मोफत डाऊनलोड करता येत असून चॅटजीपीटीप्रमाणेच विचारलेल्या बाबींवर हे तंत्रज्ञान आपल्याला माहिती पुरवण्याचं काम करतं. या तंत्रज्ञानाने अमेरिकेला थेट आव्हान दिलं आहे. आपण जाणून घेऊ यामागचा चेहरा लियांग वेंगफेंग यांच्याबाबत.

कोण आहेत लियांग वेंगफेंग?

लियांग वेंगफेंग हे नाव टेक्नॉलॉजी माहीत असलेल्या साध्यासुध्या माणसाचं नाही. कारण त्यांना फक्त तंत्रज्ञान माहीत आहे असं नाही तर त्याचा वापर करुन आणि डीपसीक तयार करुन त्यांनी थेट अमेरिकेला आव्हान दिलं आहे. लियांग वेंगफेंग यांनी झेजियांग विद्यापीठातून पदवी घेतली आहे. २०१५ मध्ये त्यांनी हाय फ्लायर नावाची कंपनी स्थापन केली. ही कंपनी कमी कालावधीतच उत्तम फंडिंग मॉडेल बनली. एआय मध्ये विशेष रुची असलेल्या वेंगफेंग यांनी पुढच्या दहा वर्षात एक असा पर्याय शोधला ज्यामुळे अमेरिका हादरुन गेली आहे. वेंगफेंग यांनी डीपसीक लाँच करेपर्यंत कोणतीही ठोस अशी योजना त्यासाठी तयार केली नव्हती. मात्र त्यांनी २०१८ ते २०२३ या कालावधीत त्यांनी एआयमधले बारकावे शोधले. वेंगफेंगने एआय प्रकल्पाचा भाग म्हणून Nvidia चीप्स खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अशा प्रकारच्या हजारो चीप्स विकत घेतल्या होत्या. त्यानंतर बायडेन प्रशासनाने त्यांना चिप्स विकत घेण्यासाठीची मर्यादा घातली. ग्राफिक्स प्रोसेसरची साठवणूक करण्यासाठी मी चिप्स विकत घेत असल्याचं वेंगफेंग यांनी सांगितलं. मात्र त्यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.

वेंगफेंग यांना ओळखणाऱ्या व्यावसायिकाने काय सांगितलं?

मी आणि लियांग वेंगफेंग जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो एक विचित्र हेअरस्टाईल असलेला निर्मळ मनुष्य आहे असं मला वाटलं होतं. आम्ही त्याचं म्हणणं गांभीर्याने घेतलं नव्हतं असं लियांग यांच्या एका भागीदाराने फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. लियांग वेंगफेंग असं काहीतरी करणार आहे आणि अमेरिकेची झोप उडवणार आहे असं स्वप्नातही वाटलं नव्हतं असंही या भागीदाराने सांगितलं.

लियांग वेंगफेंग यांनी AI चा खूप बारकाईने अभ्यास केला होता

लियांग वेंगफेंग यांना सुरुवातीपासूनच कृत्रीम बुद्धिमत्ता म्हणजेच AI बाबत प्रचंड आकर्षण होतं. AI चं कार्य कसं चालतं याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. ते निरीक्षण किती सूक्ष्म होतं याची कल्पना त्यांनी घडवलेल्या नव्या डीपसीक या तंत्रज्ञानावरुन येते आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liang wenfeng the force behind chinese ai startup deepseek that has made us tech giants nervous and put india on edge scj