कोळसा घोटाळ्यात सीबीआयकडून केल्या जाणाऱया चौकशीमधून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वगळता येणार नाही, असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते अरूण जेटली यांनी व्यक्त केले. कोळसा खाणींचे वाटप करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी सक्षम अधिकारी म्हणूनच घेतला होता. त्यामुळे त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आल्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश गेला आहे. गैरव्यवहारांबद्दल गुंतवणूक करणाऱयांची आणि सनदी अधिकाऱयांची चौकशी होते. मात्र, हा संपूर्ण निर्णय ज्यांनी सक्षमपणे घेतला, त्या पंतप्रधानांवर काहीही कारवाई होत नाही, असा संदेश सर्वसामान्यांपर्यंत गेल्याचे जेटली म्हणाले. कोळसा खाणवाटप प्रकरणामुळे देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांपर्यंत अत्यंत चुकीचा संदेश गेला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2013 रोजी प्रकाशित
मनमोहन सिंग यांना चौकशीतून वगळू नये – जेटली
कोळसा घोटाळ्यात सीबीआयकडून केल्या जाणाऱया चौकशीमधून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वगळता येणार नाही, असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते अरूण जेटली यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-10-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmohan singh cannot be kept out of cbi probe jaitley