गुजरातमधील नरोडा-पाटिया दंगलीतील दोषी आणि माजी मंत्री माया कोडनानी यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अल्पसा दिलासा दिला. कोडनानी यांना एक आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. भाजल्यामुळे कोडनानी यांनी आपल्या जामिनाच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती.
कोडनानी यांना भाजल्यामुळे त्यांनी जामिनाच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी केली. कोडनानी यांनी जामीनासाठी सुरुवातीला गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कोडनानी यांच्या वकिलांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते . गेल्या मंगळवारी एका मंदिरातील दिव्यावर पडल्याने कोडनानी यांना भाजले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.