भाजप आणि संघ परिवारातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घटकांपेक्षा उत्तर प्रदेश सरकारच दादरी मारहाण प्रकरणाला जबाबदार आहे, असे बसपाच्या नेत्या मायावती यांनी म्हटले आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आपले घटनात्मक कर्तव्य बजावण्याचा राज्य प्रशासनाने कधीही प्रयत्नच केला नाही, असा आरोपही मायावती यांनी केला. भाजप आणि संघ परिवारातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घटकांपेक्षा अखिलेश यादव सरकारच या प्रकरणी दोषी आहे. काही घटक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत तरीही सरकार कोणतीही कारवाई करीत नाही, असेही त्या म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayawati says state government responsible dadri assaulted case