एमबीए झालेल्या एका तरुणीचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला आहे. हा मृतदेह सडू लागला होता. ही तरुणी बंगळुरुतल्या एका घरात भाडे तत्त्वावर राहात होती. ही तरुणी कर्नाटकच्या दावणगिरी या ठिकाणाहून एमबीए झाली होती. तिचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी ही तरुणी नैराश्यात असावी आणि त्यातून तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला आहे. या मुलीचे आई वडील दावणगिरीला राहतात. मागील सहा महिन्यांपासून ही मुलगी बंगळुरु या ठिकाणी वास्तव्यास होती.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलीचा मृतदेह त्यांना आढळून आला ती मुलगी बंगळुरुत एकटीच राहात होती. तिचं कुटुंब दावणगिरीत असतं. मागील सहा महिन्यांपासून ही तरुणी बंगळुरुत वास्तव्य करत होती. मात्र पोलिसांना तिचा मृतदेह आढळून आला आहे. या मुलीला नैराश्य आल्याने तिने आयुष्य संपवलं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
तरुणीच्या मृत्यूची घटना नेमकी कशी समोर आली?
शनिवारपर्यंत तिला तिचे कुटुंबीय फोन करत होते. पण तिचा फोन नॉट रिचेबल होता. त्यानंतर या मुलीच्या कुटुंबाने घराच्या मालकाला फोन केला. त्याने सांगितलं तिची खोली आतून बंद आहे. ज्यानंतर पालकांनी पोलिसांकडे संपर्क साधला. पोलीस आले तेव्हा त्यांना कळलं की खोलीचं दार आतून बंद आहे. त्यांनी तो दरवाजा तोडला तेव्हा त्यांना या तरुणीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी हा अंदाज व्यक्त केला आहे की तिचा मृत्यू गेल्या काही दिवसांपूर्वीच झाला आहे. पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर तरुणीचा मृत्यू कधी झाला ते समजू शकणार आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
