मायक्रोसॉफ्टने विंडोज १० बरोबर नवीन ब्राऊजर देण्याचे ठरवले असून त्याचे नाव ‘स्पार्टन’ असे आहे. २१ जानेवारीपासून हा ब्राऊजर प्रदर्शित करण्यात येणार आहे. कंपनीच्या वॉशिंग्टन येथील रेडमंड येखील मुख्यालयात विंडोज १० साठी प्रथमच हा ब्राऊजर प्रदर्शित केला जाणार आहे. स्पार्टनची औपचारिक सुरुवात येथे होत असली तरी विंडोज १० उन्हाळ्यापर्यंत प्रदर्शित होणार नाही.
मायक्रोसॉफ्टचा विद्यार्थी थॉमस निग्रो याने व्हीएलसी मीडिया प्लेयरची आधुनिक आवृत्ती तयार केली असून ते अ‍ॅपच्या रूपात ट्विटरवर सादर केले जाणार आहे. विंडोज दहाला स्पार्टन हा ब्राऊजर फायरफॉक्ससारखा व क्रोमसारखा असतो व त्यात अनेक एक्सटेन्शन्स आहेत.अत्यंत कमी जागा वापरणारा हा ब्राऊजर डेस्कटॉप व मोबाईल डिव्हाइसेसमध्ये वापरला जाणार आहे, पण त्याला विंडोज दहा आवश्यक असेल .इंटरनेट एक्स्प्लोरर हा विकसक व वापरकर्ते यांच्यात फारसा भरवशाचा राहिलेला नाही. मायक्रोसॉफ्टचे पारंपरिक अस्तित्व कायम राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft builds a new browser as part of its windows 10 push