दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर व पोलिसांवर केलेल्या हल्ल्याला दोन दिवस उलटत नाहीत तोच शनिवारी दुपारी लष्करावर आणखी दहशतवादी हल्ला झाला. मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांनी लष्कराच्या वाहनावर हा हल्ला केला, यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.
श्रीनगरच्या मधोमध असणाऱ्या सनतनगर आणि हैदरपोरा बायपास मार्गावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी काही पोलीस अधिकारी तसेच लष्कराच्या वाहनांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक नागरिक किरकोळ जखमी झाला. या घटनेनंतर लष्कराने लगेचच परिसराचा ताबा घेतला, तसेच शोध मोहीम सुरू केली, मात्र हे हल्लेखोर पसार झाले.
लष्कराची छावणी आणि पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस, तसेच चार जवान धारातीर्थी पडले होते.
दहशतवाद्यांना पाहिल्याचा ग्रामस्थांचा दावा
दहशतवाद्यांना पाहिल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केल्याने कथुआ आणि नजीकच्या परिसरात अत्यंत सावधानतेचा इशारा देण्यात आला असून, मोठय़ा प्रमाणावर शोधसत्र सुरू करण्यात आले आहे.लष्कराच्या वेशात काही दहशतवाद्यांना पाहिल्याचा दावा ग्रामस्थांनी केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी शोधसत्र सुरू केले असून, या परिसराला वेढा घातला आहे. त्याचप्रमाणे जम्मू-पठाणकोट मार्गावर नाकेबंदी करण्यात आली असून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2013 रोजी प्रकाशित
दहशतवाद्यांचे हल्लासत्र सुरूच
दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर व पोलिसांवर केलेल्या हल्ल्याला दोन दिवस उलटत नाहीत तोच शनिवारी दुपारी लष्करावर

First published on: 29-09-2013 at 02:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Militants open fire at army vehicles policemen in srinagar area cordoned off