चीनमध्ये भूस्खलनात सुमारे १०० हून अधिक लोक गाडले गेल्याची शक्यता आहे. चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिच्युआन प्रांताताील मॅक्सियन काऊंटी येथे झालेल्या या नैसर्गिक दुर्घटनेत किमान ४० घरे उद्धवस्त झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावात भूस्खलन झाले. या घटनेनंतर बचावदलांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
Around 100 people feared buried in China landslide, reports AFP quoting state media.
— ANI (@ANI) June 24, 2017