नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात सध्या चलन कलह सुरु आहे. विरोधकांनी सभागृहात मोदी सरकारला धारेवर धरले असताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला मुस्लिमांशी जोडत सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा सर्वात जास्त त्रास हा मुस्लिमांना होत असल्याचे वक्तव्य सिब्बल यांनी लखनऊमध्ये केले.  मी दिल्लीच्या चांदनी चौक परिसरात राहतो आणि तेथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे, मी मुस्लिमांशी जोडला गेलो असल्याने मला याबाबत माहिती आहे असे सिब्बल म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहुतांश मुस्लिमांचे बँकेत खाते नसल्यामुळे सरकारच्या नोटाबंदीमुळे या समाजावर सर्वात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  शनिवारी लखनऊमध्ये अल्पसंख्यांकांच्या बैठकीला संबोधित करताना सिब्बल यांनी नोटाबंदीच्या निर्णय हा मुस्लिमांशी जोडल्याचे वृत्त ‘आजतक’ने दिले आहे. मुस्लीम समुदायातील छोटा किंवा मोठा व्यापारी व्याज मिळविण्याच्या हेतूने कमवत नसल्यामुळे तो बँकेत खाते उघडत नसल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे.  दहशतवाद्यांचा पैशाशी काहीही संबंध नसतो, असे सांगत या निर्णयामुळे दहशतवादाला आळा घालण्यास कोणतीही मदत होणार नाही, असेही सिब्बल म्हणाले. तसेच सरकारने घेतलेल्या नोटबंदीमुळे गरिबांनाही कोणताच फायदा होणार नाही त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सरकारने उचलले घातक पाऊल अाहे, असे ते म्हणाले.

काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोधक मोठ्या प्रमाणात विरोध करताना दिसत आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात या निर्णयासंदर्भात विरोधकांनी गोंधळ घातल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे. ८ नोव्हेंबरला मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून हद्दपार करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी बँकाबाहेर एकच गर्दी केली होती. या निर्णयामुळे बँका आणि डाक कार्यालयाबाहेर दिसणाऱी सामान्याची गर्दी पाहून मोदी सरकार जनतेला त्रस्त करत असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारच्या निर्णयाला मुस्लिमांशी जोडल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

नोटाबंदीच्या निर्णयावर शांत असणाऱ्या पंतप्रधानांनांनी  सभागृहात उत्तर द्यावे, अशी मागणी सिब्बल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. पंतप्रधान राज्यसभेत उपस्थित झाले मात्र त्यांनी आपण घेतलेल्या निर्णयावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचे सांगत मोदी नोटाबंदीच्या निर्णयावर शांत का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच उत्तरप्रदेशमध्ये आपली ताकत कमी असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला असल्याचा आरोपही सिब्बल यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslims are facing more problem due to demonetization says kapil sibal