केंद्रीय पोलाद मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ प्रचारतंत्रावर टीका करत मोदी आपल्या चहामधून जनतेला अफू मिसळून देत असल्याचे म्हटले आहे.
बेनीप्रसाद वर्मा म्हणतात, नरेंद्र मोदी आपल्या चहामध्ये जनतेला खोट्या आश्वासनांचा अफू मिसळत असून जनतेला त्याची सवय लागावी याचे प्रयत्न करत आहेत.
यापूर्वीही बेनीप्रसाद वर्मा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून चर्चेत राहीले आहेत. यापुढील देशाचे पंतप्रधान नरभक्षक नकोत असे म्हणत अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला होता. यावेळी वर्मांनी भाजपच्या प्रचारतंत्रावर टीका करत ‘चाय पे चर्चा’ हे सारे खोट्या आश्वासनांसाठी भूलथापा मारण्याचे धंदे चालू असल्याचे बेनीप्रसाद वर्मा म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi adding opium to tea beni prasad verma