भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची भेट घेतली. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी मोदी दिल्लीमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी अडवानी यांची भेट घेतली.
दिल्लीत आल्यानंतर अडवानी यांच्याबरोबर आपली छान चर्चा झाली. आता गडकरी यांना भेटण्यासाठी जात असल्याचे ट्विट मोदी यांनी केले आहे. अडवानी आणि मोदी यांच्यामध्ये सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ८ आणि ९ जून रोजी गोव्यामध्ये होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी झाली.