ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
दिल्लीत लोकसभेला यश मिळत असताना विधानसभेत भाजप सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या नावावरच भाजप दिल्ली विधानसभेला सामोरा जाणार. अशा वेळी केजरीवाल हे दिल्लीकर जनतेसाठी पद सोडले अशी मांडणी करून भाजपची कोंडी करण्याची शक्यता आहे.
मणिपूरमध्ये काहीही झाले, राज्य होरपळले, तरी मी भेट देणार नाही, अशी शपथच पंतप्रधानांनी घेतल्याचे दिसते. मूलत:च विभागलेल्या या राज्यातील स्थिती सुधारण्यात कोणालाच स्वारस्य नाही का?