कुतूबमिनार मशीद इमारतीचे स्वरूप काय?; जिल्हा न्यायालयाच्या दृष्टीने प्रश्न

कुतूबमिनार संकुलातील कुव्वत-उल-इस्लाम मशिदीच्या आतील २७ मंदिरांची पुनस्र्थापना करण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेच्या प्रकरणात मूलभूत प्रश्न असा पडतो की, या इमारतीचे स्वरूप काय आहे?, असे निरीक्षण दिल्लीतील न्यायालयाने नोंदवले आहे.

नवी दिल्ली : कुतूबमिनार संकुलातील कुव्वत-उल-इस्लाम मशिदीच्या आतील २७ मंदिरांची पुनस्र्थापना करण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेच्या प्रकरणात मूलभूत प्रश्न असा पडतो की, या इमारतीचे स्वरूप काय आहे?, असे निरीक्षण दिल्लीतील न्यायालयाने नोंदवले आहे.   या मशिदींमधील २७ मंदिरांच्या पुनस्र्थापनेसाठी हिंदु देवता भगवान विष्णू, जैन देवता र्तीथकर भगवान रिषभ देव आणि अन्य यांच्यावतीने करण्यात आलेला अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला होता. त्याविरोधात दाखल केलेल्या अर्जावर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश निखिल चोप्रा यांनी आपला आदेश राखून ठेवला आहे. या प्रकरणी आता ९ जून रोजी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. त्या वेळी न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ( एएसआय ) विभागाने न्यायालयाला सांगितले आहे की, या मशिदीला पुरातन स्मृतिस्थळे आणि पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९५८ चे संरक्षण मिळाल्यानंतर या मशिदीचे स्वरूप गोठविण्यात आले (जैसे थे) आहे.  तर याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर असल्यामुळे त्या ठिकाणाचे धार्मिक स्वरूप हे लक्षात घ्यायलाच पाहिजे. कनिष्ठ न्यायालयाने  म्हटले होते की,  भूतकाळात झालेल्या चुकीच्या गोष्टी या वर्तमान आणि भविष्यकाळात शांतता धोक्यात आणण्याचे निमित्त ठरता कामा नयेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nature qutub minar mosque building question point view district court ysh

Next Story
मोसमी वाऱ्यांचा श्रीलंकेनजीक खोळंबा, २७ तारखेला भारतात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी