ओडिशा पोलिसांनी माओवाद्यांचा वरिष्ठ नेता सव्यसाची पांडा याला अटक केली असून, किमान साठ गुन्हय़ांमध्ये तो पोलिसांना हवा होता. नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केले आहे. सव्यसाची याला पकडण्यासाठी पाच लाखांचे इनाम होते व छासी मुलिया समिती व कुई लावेंगा संघ या दोन संघटना १९९५ मध्ये त्याने रायगडा व गजपती जिल्हय़ात केली होती. या दोन्ही संघटना माओवादी कारवायांचा प्रसार करीत होत्या. दक्षिण ओडिशातील रायगडा, गजपती, गंजम, कंधमाल व नयागड येथे तो माओवादी कारवायांचे नेतृत्व करीत होता.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2014 रोजी प्रकाशित
ओडिशातील माओवादी नेता सव्यसाची पांडा याला अटक
ओडिशा पोलिसांनी माओवाद्यांचा वरिष्ठ नेता सव्यसाची पांडा याला अटक केली असून, किमान साठ गुन्हय़ांमध्ये तो पोलिसांना हवा होता. नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील व्हावे असे
First published on: 20-07-2014 at 02:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal leader sabyasachi panda arrested in odisha