भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळात स्थान मिळाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगामी लोकसभा निवडणुक हेच लक्ष्य असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका नेत्याने सांगितले. मोदी यांचा भाजपच्या सर्वशक्तीमान केंद्रीय संसदीय मंडळात रविवारी समावेश करण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर बोलताना या नेत्याने मोदी यांच्या भविष्यातील वाटचालीबद्दल सूचक वक्तव्य केले.
गुजरातमध्ये सलग तीनवेळा विधानसभेच्या निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने यश मिळवले. त्यानंतर त्यांची केंद्रीय संसदीय मंडळावर निवड झाली. यामुळे राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका निभावण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल, असे या नेत्याने म्हटले आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करूनच आपली संपूर्ण टीम निवडली आहे, याकडे त्याने लक्ष वेधले.
मोदी यांच्यामुळेच अमित शाह आणि स्मृती इराणी यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले असल्याचे या नेत्याने स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2013 रोजी प्रकाशित
लोकसभा निवडणूक हेच आता मोदींचे लक्ष्य
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळात स्थान मिळाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगामी लोकसभा निवडणुक हेच लक्ष्य असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका नेत्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-04-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Next lok sabha polls to be narendra modis prime focus