फुटीरतावादी नेता मसरत आलम भट याला आज दिल्लीतील पटियाला हाउस न्यायालयात एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. एनआयएने न्यायालयात काश्मीर घाटीतील दगडफेक प्रकरणी फुटीरतावादी नेत मसरत आलम भट, शब्बीर शाह व आसिया अंद्राबी यांच्या चौकशीसाठी त्यांना १५ दिवसांसाठी ताब्यात दिले जावे अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने या तिन्ही नेत्यांना दहा दिवसांसाठी एनआयएकडे सोपवण्यास परवानगी दिली.

मसरत आलमवर जवानांवर दगडफेकीचा आरोप आहे, या दगडफेकीत काही जवानांचा मृत्यू देखील झाला आहे. याशिवाय मसरतवर प्रक्षोभक भाषण करण्याचाही आरोप आहे. मसरतला २०१५ मध्ये अनेक प्रयत्नानंतर अटक करण्यात यश आले आहे. गिलानीचा जवळचा मानला जाणा-या मसरत आलमवर तब्बल दहा लाखांच इनाम ठेवण्यात आला होता. आता एनआयएला या तिघांकडून दगडफेकीसाठी मिळणारे पैसे व त्यांच्या यंत्रणे बाबतची माहिती जाणुन घ्यायची आहे.

प्राप्त माहितीनुसार ‘एनआयए’ व ‘इडी’ला असिया व शब्बीर यांच्यादरम्यान टेरर फंडिंगशी निगडीत माहिती मिळाली आहे. असिया आणि शब्बीर सद्या तिहार तुरूंगात आहेत. मसरत आलमला आज सुनावणीसाठी एनआयए न्यायालयात आणले गेले होते.