दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची येत्या २० डिसेंबरला सुटका होणार असली तरी दिल्ली उच्च न्यायालय याबाबत हस्तक्षेप करण्याची दाट शक्यता आहे. पण आरोपीची सुटका झाल्यानंतर त्याचे पुनर्वसन व्हावे आणि त्याला उदरनिर्वाह करता यावा या हेतूने केजरीवाल सरकारने त्याला आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
दिल्ली सरकारच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने सोमवारी न्यायालयात आरोपीच्या पुनर्वसनाची योजना सादर केली. आरोपीची सुटका झाल्यानंतर त्याला टेलरिंगचे काम करून उदरनिर्वाह करता यावा यासाठी दिल्ली सरकार आरोपीला १० हजार रुपयांची मदत आणि शिलाई मशीन देणार असल्याचे दिल्ली सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्ली सरकारच्या या भूमिकेवर केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली असून, आरोपीला बालसुधारगृहातच ठेवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. आरोपीच्या सुटकेला निर्भयाचे पालक आणि सामाजिक संघटनांनी देखील विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आरोपीच्या शिक्षेत आणखी दोन वर्षांची वाढ होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirbhaya juvenile to walk free on dec 20 centre opposes move