वाहतुकीच्या नियमांचे योग्य रितीने पालन होण्यासाठी तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. २ जुनपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे, यासाठी विशेष मोहिमदेखील प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर केवळ हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारानांच गाडीत पेट्रोल भरून मिळत आहे. पेट्रोल पंपचालकांनीही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून सुरक्षित प्रवासासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2016 रोजी प्रकाशित
हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल नाही!
जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर केवळ हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारानांच गाडीत पेट्रोल भरून मिळत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 06-06-2016 at 11:53 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No petrol for two wheeler drivers without helmet in adilabad