सेक्स अॅक्टदरम्यानचा व्हिडिओ समोर आल्याने एका देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या राजकीय नेत्याला राजीनामा देण्याची वेळ आली. मात्र हा व्हिडिओ व्हायरल करणं हे आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा दावा या पंतप्रधांनांनी केली. हे पंतप्रधान आहेत इरसान सानेर.
सानेर हे उत्तर सायप्रस या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा सेक्स अॅक्ट व्हिडिओ एका माफियाने लीक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
५४ वर्षीय इरसान सानेर हे गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय दबावाखाली असल्याचं सांगितलं जात आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या पक्षाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. मात्र, सानेर राजकारणात होते. निवडणुकीनंतर सानेर यांनी राजकारण सुरू ठेवण्याचं नियोजन केलं होतं. मात्र, अशा प्रकारचा अडचणीत टाकणारा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. त्यांची राजकीय कारकीर्द यामुळे संकटात सापडली आहे.
ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.
या व्हिडिओमध्ये एक तरुणी आपल्या अंगावरचे कपडे क्रमाक्रमाने काढत आहे, ज्याला स्ट्रीप टीझ करणे म्हणतात. तर पंतप्रधान सानेर हे हस्तमैथुन करताना दिसत आहेत. मात्र सानेर यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना सानेर म्हणाले की हा व्हिडिओ माझा नाही. कोणीतरी माझ्या देशाची, पक्षाची सेवा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय मार्गाने आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही म्हटल्यावर ते अशा पद्धतीने हल्ले माझ्यावर करत आहेत.
त्याचबरोबर हे माफियांचं षडयंत्र असून हा हल्ला केवळ आपल्यावर नसून आपल्या कुटुंबावर, पक्षावर आणि राजकीय संस्थावर हल्ला केला असल्याचंही सानेर म्हणाले. आपण कायदेशीर सल्लागारांबरोबर चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रकारामुळे देशातलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं असल्याचं चित्र आहे.