ओमप्रकाश चौटाला यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना चार वर्षांचा कारावास आणि ५० लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

पीटीआय, नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना चार वर्षांचा कारावास आणि ५० लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी ही शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौटालांच्या मालमत्तांपैकी चार मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने चौटाला यांना गेल्या आठवडय़ात दोषी ठरवताना नमूद केले होते, की या मालमत्तेबाबतचा हिशेब समाधानकारकरीत्या देण्यात चौटाला अपयशी ठरले आहेत. ज्या काळात या मालमत्ता चौटाला यांनी घेतल्या, त्या काळातील त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांविषयी समाधानकारक खुलासा ते देऊ शकले नाहीत.

 याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २६ मार्च २०१० रोजी  आरोपपत्र दाखल केले होते.  चौटाला यांनी १९९३ ते २००६  दरम्यान  सहा कोटी नऊ लाख रुपये किमतीची  मालमत्ता जमविल्याचा आरोप आहे. ती १८९.११ टक्क्यांनी अधिक असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.  

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Omprakash chautala sentenced four years prison property in the case ysh

Next Story
मुस्लिमांच्या जातनिहाय गणनेवर मतैक्य; बिहारमधील दहा पक्षांची १ जून रोजी बैठक
फोटो गॅलरी