दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एका आरोपीने या खटल्याची सुनावणी दिल्लीबाहेर घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. आपल्याविरुद्ध जनतेच्या अत्यंत तीव्र भावना असल्याने मुक्त वातावरणात येथे सुनावणी होणे शक्य नाही, असे या आरोपीने म्हटले आहे.
सदर आरोपीचे नाव मुकेश असे असून त्याने सुनावणी अन्यत्र घेण्याबाबत याचिका केली आहे. बलात्कार आणि हत्या याविरुद्ध सातत्याने करण्यात येणाऱ्या निदर्शनांमुळे निदर्शकांच्या मागणीनुसार निर्णय देण्याचा दबाव पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर आला आहे. त्यामुळे मुक्त वातावरणात सुनावणी होणे शक्य नाही, असेही मुकेश याने याचिकेत म्हटले आहे.
दिल्लीतील प्रत्येक घरात जनक्षोभ उसळला आहे, न्यायव्यवस्थेतील अधिकारी आणि राज्याचीही त्यामधून गय केली जाणार नाही आणि अशा स्थितीत दिल्लीत आपल्याला न्याय मिळू शकणार नाही, असेही त्याने याचिकेत म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One accused filled petition to take hearing out of delhi