गुजरातमध्ये नदीत मगरीच्या हल्ल्यात एक जण मृत्युमुखी

स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. रात्री दहाच्या सुमारास त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला

गुजरातमध्ये नदीत मगरीच्या हल्ल्यात एक जण मृत्युमुखी
(संग्रहित छायाचित्र)

वडोदरा : गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील एका नदीत मगरीने एका ३० वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला. त्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, तासाभराच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

उप वनसंरक्षक रविराजसिंह राठोड यांनी सांगितले, की रविवारी दुपारी ही घटना पदरा तालुक्यातील सोखदरघु गावाजवळील धाधर नदीत घडली. ही धक्कादायक घटना घडली, त्या वेळी किनाऱ्यावरून स्थानिक रहिवासी आपल्या मोबाइलमध्ये त्याची चित्रफीत बनवत होते. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. रात्री दहाच्या सुमारास त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. मृताचे नाव इम्रान दिवाण असे असून तो सोखदरघु गावचा रहिवासी आहे. त्यांच्या खांद्यावर मगरीच्या चाव्याच्या खुणा होत्या. तो नदीत कसा पडला हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण तो नदी पात्रात असतानाच स्थानिकांनी त्याच्यावर मगरीने हल्ला केल्याचे पाहिले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One person died in a crocodile attack in a river in gujarat zws

Next Story
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये भागीदारीचा सरकारचा निर्णय
फोटो गॅलरी