कांद्याच्या उत्पादनात २०१२-१३ (जून ते मे) या कालावधीत पाच टक्के घट होईल असा अंदाज असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. २०११ मध्ये कांदा उत्पादन १७५.११ लाख टन होते. या वेळी ते १६६.५५ लाख टन अपेक्षित असल्याचे शरद पवार यांनी राज्यसभेत लेखी उत्तरादरम्यान स्पष्ट केले. देशात कांद्याची मागणी १० लाख टन आहे. याखेरीज जवळपास १५ ते २० लाख टन कांद्याची निर्यात होत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. एक लाख टन कांदा बियाणे उत्पादनासाठी, तर तीन ते पाच लाख टन कांद्यावर दर वर्षी प्रक्रिया होत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-08-2013 at 12:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion production expected decrease by