पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानचे सर्वोच्च नेते नव्हे तर हिजबुल मुजाहिद्दीनचे कमांडर असल्यासारखे बोलत होते, अशा शब्दांत भाजप नेते राम माधव यांनी टीका केली आहे. शरीफ यांनी भाषणादरम्यान उघडपणे बुरहान वानीसारख्या दहशतवाद्याचे समर्थन केले. त्यांच्या या भाषणामुळे आतापर्यंत भारताने शरीफ आणि पाकविरुद्ध केलेले आरोप एकप्रकारे सिद्ध झाल्याचे राम माधव यांनी म्हटले. पाकिस्तानला राजनैतिक आणि अन्य स्तरांवर सडेतोड प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकार योग्य ती पावले उचलेल आणि उरीतील हल्लेखोरांना माफ केले जाणार नाही, याचा मला विश्वास असल्याचेही राम माधव यांनी सांगितले. तसेच पाकिस्तान हे नकली राष्ट्र असून त्यांना फक्त शस्त्रांचीच भाषा कळते. पाकिस्तान आपल्याला शस्त्रास्त्रांनी धमकावत असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची गरज असल्याचे राम माधव यांनी सांगितले.
दरम्यान, नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत केलेल्या भाषणात बुरहान वानी हा जम्मू काश्मीरमधील शांततेसाठी काम करणारा तरुण नेता असल्याचे म्हटले होते. तसेच काश्मीर प्रश्नावर तोडगा काढल्याशिवाय भारत – पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण होणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले होते. शरीफ यांच्या या विधानाला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी इनाम गंभीर यांनी पाकिस्तानची दहशतवाद्याबद्दलची दुटप्पी भुमिका जगासमोर मांडली. त्या म्हणाल्या, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना आमच्या देशाला करावा लागत आहे. पाकिस्तानच्या या भुमिकेचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. आत्मकेंद्रित भूमिकेमुळे पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र ठरत असल्याचे सांगत जगाकडून मिळणारी आर्थिक मदत पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरत असल्याचा आरोप केला. पाकिस्तान हा सर्व पैसा ते भारताविरोधात दहशतवाद्यांना लढण्यासाठी दिला जातो. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पैशांचा वापर करतात. अनेक दहशतवादी संघटना आणि त्यांचे नेते पाकिस्तानच्या सहकार्याने मुक्तपणे सगळीकडे वावरतात. अनेक दहशतवादी संघटना खुलेपणाने निधी गोळा करतात, याकडेही गंभीर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे लक्ष वेधले.
Pak PM at UN was at his pathetic best, he talked not like Supreme Commander of Pak but Supreme Commander of Hizbul Mujahideen: Ram Madhav
— ANI (@ANI) September 22, 2016
Pakistan PM was openly campaigning for one of his terror commanders, Burhan Wani: Ram Madhav, BJP pic.twitter.com/dgUpURh1Py
— ANI (@ANI) September 22, 2016
It is pathetic to see Pak PM championing the cause of UN designated terror org. Pak should be declared a terrorist state: Ram Madhav, BJP
— ANI (@ANI) September 22, 2016
Nawaz Sharif with his speech yesterday established everything that India has been saying about him & the govt in Pak: Ram Madhav
— ANI (@ANI) September 22, 2016
At diplomatic level, befitting response to Pak has been given. We will respond to Pak on its Uri misadventure at multiple levels: Ram Madhav
— ANI (@ANI) September 22, 2016
Apart from diplomatic offensive which we have already launched, the other aspects will also be taken care of: Ram Madhav pic.twitter.com/5v74mj8Jv8
— ANI (@ANI) September 22, 2016
I am sure the Govt will take necessary actions, perpetrators of #UriAttack will not be spared: Ram Madhav pic.twitter.com/UdugKyEfJn
— ANI (@ANI) September 22, 2016
Giving more evidence to Pak is like water off a duck's back. No use. We have to isolate Pakistan : Pavan Varma, former Indian ambassador. pic.twitter.com/8Yhlw6DbbL
— ANI (@ANI) September 22, 2016
Pak is a rogue nation where weapons are concerned. If Pak blackmails us with those, they will be given a befitting response: Ram Madhav
— ANI (@ANI) September 22, 2016