भारतीय सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. शस्त्रसंधी उल्लंघन करण्याची पाकिस्तानची जून महिन्यातील ही तिसरी वेळ आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधून चौघे जण पुंछमधील कृष्णा घाटी विभागातून भारताच्या हद्दीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी भारतीय सैन्याने गोळीबार करून घुसखोरी करणाऱ्यांना पिटाळून लावले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून पुंछ विभागातील तीन चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. यात भारताच्या बाजूने कुणीही जखमी झालेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2013 रोजी प्रकाशित
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
भारतीय सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. शस्त्रसंधी उल्लंघन करण्याची पाकिस्तानची जून महिन्यातील ही तिसरी वेळ आहे.

First published on: 20-06-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak violates ceasefire along loc after indian troops foil infiltration bid