pakistan chopper crashed in Balochistan carrying two major rank officers and at least three Special Protection Group SPG commandos | Loksatta

Helicopter Crash: पाकिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, दोन मेजरसहित सहा लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू

पाकिस्तान लष्कराने या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केले नाही

Helicopter Crash: पाकिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, दोन मेजरसहित सहा लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू
(सांकेतिक छायाचित्र)

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत सहा लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मेजर आणि ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’च्या (SPG) तीन कमांडोंचा समावेश आहे. बलुचिस्तानातील हरनाई भागात एका उड्डाण मोहिमेदरम्यान हा अपघात झाला आहे. पाकिस्तान लष्कराने या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केले नाही.

कुणाला मूर्ख बनवताय? पाकिस्तानला लढाऊ विमानं देण्यावरून परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकेला खडा सवाल

पाकिस्तानातील आंतर सेवा जनसंपर्क कार्यालयाने या अपघाताची पुष्टी केल्याचे वृत्त पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘डॉन’ने प्रकाशित केले आहे. या दूर्घटनेत सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-09-2022 at 11:46 IST
Next Story
Bus Accident: पर्यटकांची बस दरीत कोसळली; सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये आयआयटीच्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश