भारताकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ संरक्षक भिंत बांधली जात असल्याबाबत तसेच एकतर्फी कारवाई केली जात असल्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझिझ यांनी गुरुवारी सांगितले.प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जर्मनीतील बर्लिन भिंतीप्रमाणे भारत संरक्षक भिंत बांधत असल्याबाबत पाकिस्तानला कोणतीही माहिती मिळालेली नाही, असेही पंतप्रधानांचे परराष्ट्रीय व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणाऱ्या अझिझ यांनी स्पष्ट केले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कायमस्वरूपी भिंत बांधण्याबाबत भारताकडून एकतर्फी अशी कोणतीही घोषणा झाली नसल्याचेही पाकिस्तान रेडीओवरून बोलताना अझिझ म्हणाले. अमेरिकेकडून पाकिस्तानच्या प्रदेशात केले जाणारे द्रोण हल्ले चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan has no information on building of wall on loc sartaj aziz