पाकिस्तानचे तत्कालिन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची खळबळजनक माहिती पाकिस्तानचे निवृत्त कर्नल अशफाक हुसैन यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. मुशर्रफ यांनी नियंत्रण रेषा ओलांडून सुमारे ११ किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दील घुसखोरी केली होती, असा दावा हुसैन यांनी केला.
हुसैन यांच्या ‘विटनेस टू ब्लंडर’ या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकाबद्दल गुरुवारी पाकिस्तानातील वाहिन्यांवर माहिती देण्यात येत होती. दरम्यान, खुद्द मुशर्ऱफ यांनी ही सर्व माहिती निराधार असल्याचा खुलासा केला.
पुस्तकात असे म्हटले आहे की, २८ मार्च १९९८ रोजी जनरल मुशर्ऱफ यांनी हेलिकॉप्टरमधून नियंत्रणरेषा ओलांडून ११ किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी रात्र भारतीय हद्दीतच काढली होती. हे पुस्तक २००८ मध्येच प्रसिद्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2013 रोजी प्रकाशित
मुशर्रफ यांनी केली होती भारतीय हद्दीत घुसखोरी
पाकिस्तानचे तत्कालिन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची खळबळजनक माहिती पाकिस्तानचे निवृत्त कर्नल अशफाक हुसैन यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे.
First published on: 01-02-2013 at 11:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parvez musharraf infiltrated in india