* पंतप्रधानांकडून जखमींची विचारपूस
पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी आज(रविवार) हैदराबाद येथील दिलसुखनगर परिसरात झालेल्या दुहेरी बाँबस्फोट घटनास्थळाला भेट देली. तसेच त्यांनी बाँबस्फोटातील जखमींची विचारपूस देखील केली. नवी दिल्लीहून विशेष विमानाने हैदराबादला आले आणि घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्यासोबत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी हे सुद्धा होते. घटनास्थळाला भेट देण्यासोबतचं पंतप्रधानांनी बाँबस्फोटातील जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. सदर बाँबस्फोटाप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm manmohan singh arrives in hyderabad to visit blast sites