‘पुलित्झर’ मानकरी सना इर्शाद यांना दिल्ली विमानतळावर रोखले 

पॅरिसमध्ये एका प्रकाशन सोहळय़ासाठी तसेच छायाचित्र प्रदर्शनासाठी सना जाणार होत्या

kashmiri journalist sana irshad
पुलित्झर पुरस्काराच्या मानकरी सना इर्शाद मट्टो

श्रीनगर : काश्मीरमधील वृत्तछायाचित्रकार आणि पुलित्झर पुरस्काराच्या मानकरी सना इर्शाद मट्टो या शनिवारी फ्रान्सला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर गेल्या असता इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना विमान प्रवासास मनाई केली. 

पॅरिसमध्ये एका प्रकाशन सोहळय़ासाठी तसेच छायाचित्र प्रदर्शनासाठी सना जाणार होत्या. त्यांना दिल्ली विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता अटकाव केला. तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. 

मला फ्रान्सने व्हिसा मंजूर केल्यानंतरही दिल्ली विमानतळावरील आंतरराष्ट्रीय कक्षातील अधिकाऱ्यांनी प्रवासास मनाई केली, असे सना यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले की, सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासास मनाई केलेल्या पत्रकारांच्या यादीत सना यांचाही समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pulitzer winning kashmiri journalist sana irshad stopped at delhi airport zws

Next Story
‘केसीआर’ यांची मोदींकडे पाठ, यशवंत सिन्हांचे मात्र स्वागत ; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विरोधकांवर तीव्र टीका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी