रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे बँकिंग व्यवस्थेच्या अक्षमतेविरुद्ध लढत असल्यामुळे आणि भांडवलदारांशी संघर्ष करत असल्यामुळेच त्यांच्यावर टीका करण्यात येत असल्याचे सांगून, शिकागो विद्यापीठातील राजन यांचे सहकारी व सहलेखक लुइगी झिंगेल्स यांनी त्यांची पाठराखण केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजन यांची गव्हर्नरपदाची मुदत सप्टेंबरअखेर संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ दिली जाईल की नाही, याबाबत भारतात सुरू असलेल्या जोरदार चर्चेच्या पाश्र्वभूमीवर झिंगेल्स यांनी हे वक्तव्य केले आहे.

यापूर्वी गव्हर्नरचे पद ‘कुठलाही प्रभाव नसलेल्या वृद्ध नोकरशहांकडे’ सोपवले जात होते. मात्र तरुण व सक्षम असलेले राजन हे नव्या भारताचे स्वप्न असून, ते स्वत:च्या कौशल्यामुळे भारताच्या मध्यवर्ती बँकेच्या सर्वोच्चपदी पोहोचले आहेत; राजकीय बांधिलकीमुळे नव्हे, असे त्यांनी एका लेखात लिहिले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ आणि शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझिनेसमधील वित्त विभागाचे (सध्या सुटीवर असलेले) प्राध्यापक रघुराम राजन हे अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने आवश्यक व्याजदर कपात न करण्यास अपयशी ठरल्याचे सांगून भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह इतरांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghuram rajan being attacked for fighting crony capitalism says his chicago university colleges